अनुष्का शर्माने सुरु केली संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 12:09 IST
आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसोबत न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय केल्यानंतर अनुष्का शर्मा कामावर परतली आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तिने सुरु ...
अनुष्का शर्माने सुरु केली संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग
आपला बॉयफ्रेंड विराट कोहलीसोबत न्यूयॉर्कमध्ये व्हेकेशन एन्जॉय केल्यानंतर अनुष्का शर्मा कामावर परतली आहे. आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग तिने सुरु केली आहे. अनुष्का सध्या संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिचे सोशल मीडियावर विराटसोबतचे न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते आता तिचे शूटिंग दरम्यानचे फोटो व्हायरल होतायेत. या फोटोमध्ये अनुष्का मेकअपमध्ये बसलेली दिसत आहे. अजून चित्रपटाची 2 दिवसांची शूटिंग बाकी आहे. शूटिंग संपल्यावर ती लगेचच भारतात परतणार आहे. तिला हैरी मेट सेजल या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला शाहरुख खानसोबत करायचे आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये अनुष्का एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एक इंटव्ह्यु दरम्यान अनुष्काला विचारण्यात आले होते की या चित्रपटात तू कॉमिओ करणार आहेस याला घेऊन तू किती उत्सुक आहेस. यावर ती म्हणाली मी यात त्याच्या गर्लफ्रेंडची किंवा पत्रकाराची भूमिका साकारत नाही आहे. माझा रोल फिक्शनल आहे. संजय दत्तच्या बायोपिकचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करतायेत. संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतो आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. यात सोनम कपूर, विक्की कौशल आणि मनीषा कोईराला यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट आधी सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है चित्रपटासोबत रिलीज होणार होता. मात्र बॉक्स ऑफिसवरील क्लैशेस टाळण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाला 2018च्या मार्चमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यात संजय दत्तच्या आयिष्यातील वेगवेगळे टप्पे दाखवण्यात येणार आहेत.