Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंसीच्या जुन्या आठवणींमध्ये अनुष्का रममाण; फोटो शेअर केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:04 IST

अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

बॉलिवूडमधील सेलिब्रेटी कधी कोणत्या कारणांमुळे चर्चेत येतील, हे सांगता येत नाही. आता अभिनेत्री अनुष्का शर्माचंच पाहा ना...तिने फक्त सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या प्रेग्नेंसीच्या काळातील जुना फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला तर लगेच त्यावरून सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले. 

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सध्या लेक वामिकाच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले आहे. तिने वर्षभरापूर्वीच्या वेळीचा काळ आठवून थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. तिने थ्रोबॅक म्हणजेच, 20 नोव्हेंबर, 2020चा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो आणि आनंद पाहायला मिळतो आहे.

अनुष्का शर्माने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, आठवणी...20 नोव्हेंबर, 2020. तिचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती एथनिक आउटफिटमध्ये दिसते आहे. तिचा हा फोटो तिचे वडील कॅमेऱ्यात टिपत आहेत. वर्षभरापूर्वीदेखील तिचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता.

वामिकाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुकअनुष्का शर्माने अद्याप तिची लेक वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. तिचे चाहते लेकीचा फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विराट अनुष्काने वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्यात तिचा चेहरा पाहायला मिळाला नाही.अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे लोकप्रिय कपल आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. इतकेच नाही तर ते दोघे एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना अजिबात संकोच बाळगत नाहीत. ते दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली