Join us

बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काने फोटो केला शेअर, तर विराट म्हणाला - 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 19:39 IST

विरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.

विराट अनुष्काने काही दिवसांपूर्वी गुड न्युज शेअर करत चाहत्यांसह आनंद शेअर केला होता. त्यानंतर अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शन देत म्हटले आहे की, 'जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक आणि सुखद काहीही नाही. 'फोटो शेअर करताच असंख्य चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

अनुष्काने फोटो शेअर केला पती विराट कोहली तरी कसा मागे राहणार त्यानेही पत्नी अनष्काच्या फोटोंवर कमेंट करत लिहीले की, 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये'. अनुष्का आणि विराट यांनी 27 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी दिली होती. जानेवारी 2021 मध्ये यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार त्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांमध्ये विराटनं आशियाई सेलिब्रेटींमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 75 मिलियनहून अधिक झाली आहे. जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटचा 29वा क्रमांक येतो, तर खेळाडूंमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( 238 मिलियन), लिओनेल मेस्सी ( 164 मिलियन) आणि नेयमार ( 141 मिलियन) हे अव्वल तीन स्थानावर आहेत.

अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहली 

विरुष्का 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे.

अनुष्का शर्मासाठी विराट आहे बराच पझेसिव्ह !

2016च्या सुरुवातीला विराट आणि अनुष्का यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. टी-20 वर्ल्ड कप दरम्यान विराटची कामगिरी चांगली होत होती. मात्र महत्त्वाच्या मॅचला तो साजेशी कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सनी अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे विराट चांगलाच संतापला. त्याने ट्विट करुन सगळ्या प्रकाराचा निषेध केला. शिवाय अनुष्कापासून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते असं त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं होतं.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली