Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय अनुष्का शर्माने खरच सोडला अभिनय? हे आहे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:19 IST

‘झिरो’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्माने एकही चित्रपट साईन केलेला नाही आणि कदाचित म्हणूनच, अनुष्काने अभिनय सोडल्याची चर्चा जोर धरू लागलीय.

ठळक मुद्देजून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीला चीअर करण्यासाठी  अनुष्का शर्मा जाणार असल्याचे समजत आहे.

‘झिरो’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्माने एकही चित्रपट साईन केलेला नाही आणि कदाचित म्हणूनच, अनुष्काने अभिनय सोडल्याची चर्चा जोर धरू लागलीय.  अनुष्का सध्या अभिनयापेक्षा दिग्दर्शनावर फोकस करतेय, अशीही चर्चा ऐकू येतेय.  ‘एनएच 10’ सारखे चर्चित चित्रपटांच्या निर्मितीनंतर अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसने मोठ्या स्तरावर कंटेट तयारी चालवली असल्याचीही चर्चा आहेच.  पण आता अनुष्काच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

या व्यक्तीचे खरे मानाल तर, अनुष्काने अभिनय सोडण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या ती केवळ विराटच्या खेळावर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणून तिने कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. अनुष्का अ‍ॅक्टिंग सोडणार, अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे, असे या व्यक्तीने स्पष्ट केले आहे.

जून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीला चीअर करण्यासाठी  अनुष्का शर्मा जाणार असल्याचे समजत आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा अनुष्का सामना पाहायला गेली तेव्हा बहुतांशवेळा कोहलीला सामना जिंकता आलेला नाही. यामुळे अनेकदा अनुष्का ट्रोल झाली. पण या ट्रोलिंगची पर्वा न करता, हे संपूर्ण सीझन अनुष्काने पती विराटसाठी रिजर्व केले आहे. कदाचित क्रिकेट वर्ल्ड कपच्या तोंडावर अधिकाधिक वेळ पतीसोबत घालवण्याची तिची इच्छा आहे. याचे फलित काय, हे तर वर्ल्ड कपनंतरच कळेल. तोपर्यंत अनुष्काच्या करिअरवर याचा विपरित परिणाम होऊ नये, म्हणजे मिळवले.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली