Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मावर कोसळला दुःखाचा डोंगर, सोशल मीडियावर शेअर केले दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 13:43 IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा मेकअप आर्टीस्ट सुभाष वंगल उर्फ सुब्बू यांचे नुकतेच निधन झाले आहे. अनुष्का सुब्बू यांच्या निधनामुळे प्रचंड भावूक झाली आहे आणि तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुभाषसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

अनुष्का शर्मा हिने सुब्बू यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, सुभाष हे फार प्रेमळ आणि विनम्र व्यक्ती होते. त्यांची आणि माझी चांगली मैत्री होती. त्यामुळे मी त्यांना कायम मॅस्ट्रो म्हणजेच उस्ताद म्हणायचे. त्यांच्या कौशल्यामुळेच मी पडद्यावर कायम सुंदर दिसायचे. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कामामुळे आणि गुणवत्तेमुळे ते प्रत्येकाच्या स्मरणात राहतील. आज एक चांगला मुलगा, भाऊ आपल्यातून निघून गेला आहे. सुब्बू यांच्या निधनावर बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनी दुःख व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो या चित्रपटात झळकली होती. मात्र त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. तसंच तिने अद्याप कोणत्या आगामी प्रोजेक्टची घोषणादेखील केलेली नाही. 

टॅग्स :अनुष्का शर्माझिरो सिनेमा