क्रिकेटच्या ‘हीरो’ला सोडून बॉलिवूडच्या ‘झीरो’कडे गेली अनुष्का शर्मा, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 17:27 IST
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा कामावर परतली आहे. तिने तिच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
क्रिकेटच्या ‘हीरो’ला सोडून बॉलिवूडच्या ‘झीरो’कडे गेली अनुष्का शर्मा, पाहा फोटो!
अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या एक महिन्यापासून सुट्या सेलिब्रेट करीत आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी लग्न केल्यानंतर रिसेप्शन, हनिमूून आणि दक्षिण आफ्रिकेत न्यू इअर सेलिब्रेशन करून ती आता कामावर परतली आहे. याबाबतची माहिती स्वत: अनुष्कानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. क्रिकेटचा हीरो विराट कोहलीसोबत व्हेकेशन एन्जॉय केल्यानंतर ती ‘झीरो’ या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आहे. तब्बल महिनाभरानंतर परतलेल्या अनुष्काचे टीमने जंगी स्वागत केले. तिच्या वॅनिटी व्हॅनला चांगलेच सजविण्यात आले होते. अनुष्काने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तिचे कशापद्धतीने स्वागत केले गेले हे दिसून येते. फोटोमध्ये अनुष्का खूपच खूश दिसत आहे. तिच्या एका हातात कॉफी तर दुसºया हातात ग्रीटिंग कार्ड बघावयास मिळत आहे. तर तिच्या वॅनिटी व्हॅनला व्हायलेट रंगाच्या फुलांनी सजविल्याचे दिसत आहे. असो, अनुष्काने साउथ आफ्रिकेवरून परताच तिच्या ‘झीरो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूख खान आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. १ मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये शाहरूख बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. शाहरूखचा हा टीजर यु-ट्यूबवर चांगलाच हिट होत असताना दिसत आहे. दरम्यान शाहरूख, अनुष्का आणि कॅटरिनाने या अगोदर २०१२ मध्ये आलेल्या ‘जब तक है जान’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘झीरो’ या चित्रपटानंतर अनुष्का फेब्रुवारीमध्ये अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘सुईधागा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर होम प्रॉडक्शनच्या ‘परी’ या चित्रपटाचे प्रमोशनही करणार आहे. तिचा हा हॉरर चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.