दिलजीतच्या प्रेमात आकंठ बुडाली अनुष्का शर्मा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:11 IST
अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला. या ट्रेलरमधील कधी नव्हे इतकी सुंदर ‘चेटकिण’ही आपण बघितली. या ...
दिलजीतच्या प्रेमात आकंठ बुडाली अनुष्का शर्मा!
अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला. या ट्रेलरमधील कधी नव्हे इतकी सुंदर ‘चेटकिण’ही आपण बघितली. या चित्रपटात अनुष्का शर्मा फ्रेंडली भूताच्या भूमिकेत आहेत. ‘फिल्लोरी’च्या या मजेदार अँगलने लोकांची उत्सूकता अर्थातच वाढलीय. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर पाहिल्यानंतर तुमची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार आहे.अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का व दिलजीत दोसांज एकमेकांच्या डोळ्यांत आकंठ बुडालेले दिसत आहेत. कुणाचीही पर्वा न करता अनुष्का व दिलजीत आपल्याच विश्वात रमलेले आहेत. काही प्रेमकथा आयुष्य संपल्यानंतरही कायम राहतात, असे हे पोस्टर शेअर करताना अनुष्काने लिहिलेय. }}}}क्लिन स्लेट फिल्म आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या चित्रपटात अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे. ‘लाईफ आॅफ पाय’ फेम अभिनेता सूरज शर्मा हा सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते,असे या चित्रपटाचे कथानक आहे. ‘फिल्लोरी’ हा चित्रपट एक प्रेमकथा आहे.ALSO READ : Watch Phillauri Trailer : अशी अनुष्का शर्मा तुम्ही कधीच पाहिली नसेल!महिला सुपरहिरो चित्रपटात काम करायला आवडेल -अनुष्काअनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली होती. आता अनुष्काचा हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे, तेव्हा तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.