Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat-Anushka : पहिल्या भेटीनंतर अनुष्काला विराट वाटला होता गर्विष्ठ, क्रिकेटरनेही उडवली होती अभिनेत्रीची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 10:58 IST

विराटला पहिल्यांदा अनुष्काला गर्विष्ठ वाटला आणि त्यामुळे तिनेही क्रिकेटरला अ‍ॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली.

Anushka Sharma-Virat Kohli First Meeting:अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी लोकांना खूप आवडते. दोघांची लव्हस्टोरी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. विराट आणि अनुष्काचे 2017 मध्ये लग्न झाले होते. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते. इथून दोघांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराटला पहिल्यांदा भेटताना अनुष्काला तो गर्विष्ठ वाटला आणि त्यामुळे तिनेही क्रिकेटरला अ‍ॅटिट्यूड द्यायला सुरुवात केली.

विराट-अनुष्काची पहिली भेटअनुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते की, विराटसोबत तिची पहिली भेट कशी झाली होती. यादरम्यान तिने सांगितले की ती विराटला गर्विष्ठ समजत होती, पण जेव्हा ती त्याला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिचं मतं पूर्णपणे बदलले. अनुष्का म्हणाली होती, 'तुम्ही मला विचाराल तर विराट माझ्या घरी आला होता का? तो तुझा मित्र आहे का? किंवा मी त्याला ओळखतो का? त्यामुळे या सर्व प्रश्नांना मी होय असे उत्तर देईल. एका अॅड शूट दरम्यान आम्ही एकत्र काम केलं होतं. या दरम्यान मी नेहमीच त्याच्यावर वरचढ राहण्याचा प्रयत्न केला कारण मला विराट गर्विष्ठ वाटला आणि तो गर्विष्ठ असल्याचे मी अनेकदा ऐकले होते.

अनुष्का पुढे म्हणाली, "पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मग आमच्या संवाद सुरु झाला.तेव्हा मला तो खूप हुशार आणि मजेदार वाटला. विराटने त्याआधी अनेक जाहिराती शूट केल्या होत्या आणि माझे ते पहिले अॅड शूट होते". विराटने सांगितले होते की, जेव्हा तो अनुष्काला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने तिच्या हिल्सची  खिल्ली उडवली होती.

विराटने अनुष्काची मागितली होती माफीविराटने सांगितले की, हील्समुळे अनुष्का त्याच्यापेक्षा खूप उंच दिसत होती. विराट अनुष्काला म्हणाला, "तुला सांगितले असेल की मी 6 फुटांचा आहे, त्यामुळे तू हील्स घालायला नको होतेस". विराटचे हे बोलणे ऐकून अनुष्का आश्चर्यचकित झाली आणि तिने 'एक्सक्यूज मी' असे उत्तर दिले. विराटच्या म्हणण्यानुसार, अनुष्काचे उत्तर ऐकल्यानंतर त्याला आपली चूक समजली, त्यानंतर त्याने तिची माफी मागितली आणि मी फक्त विनोद करत असल्याचे सांगितले.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली