Join us

Confirm! दुसऱ्यांदा गरोदर आहे अनुष्का शर्मा, व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसला बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:40 IST

अनुष्काचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. परंतु अभिनेत्रीने अद्याप या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.अशातच अनुष्काचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यात ती विराट कोहलीचा हात धरुन चालताना दिसतेय.  

या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा सैल काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिचा बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.  त्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची चर्चा अधिकच रंगली आहे. कारण, यात अभिनेत्रीचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसतोय. बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का पती विराट कोहलीसोबत हातात हात घालून चालताना दिसत आहे.

12 नोव्हेंबर रोजी दिवाळीला होणार्‍या भारत विरुद्ध नेदरलँड विश्वचषक सामन्यासाठी दोघेही बेंगळुरूला गेले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनुष्का-विराटच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सने अनुष्का 100 टक्के प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. एका चाहत्याने लिहिले, “दुसरा विराट येत आहे.” दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले,  “अनुष्का आधीपासूनच प्रेग्नेंट आहे.” 

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नानंतर चार वर्षांनी २०२१मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. वामिका असं विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव आहे. आता पुन्हा ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

टॅग्स :अनुष्का शर्मा