Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्माचं कमबॅक? १८०० कोटींच्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री, कोणत्या अभिनेत्यासोबत झळकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:11 IST

अनुष्काच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. २०१७ मध्ये शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात दिसल्यानंतर अनुष्काने कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता अनुष्काच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अनुष्का शर्मा चक्क दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या चित्रपटातून कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झुलन गोस्वामी यांच्या जीवनावरील 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून अनुष्का कमबॅक करेल, अशी सर्वांना खात्री होती. या चित्रपटाचे शुटिंगही पूर्ण झाले होते, मात्र काही कारणास्तव हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. अशातच, 'डेक्कन क्रॉनिकल'च्या वृत्तानुसार, अनुष्का आता दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटली (Atlee) याच्या आगामी बिग बजेट चित्रपटात दिसू शकते. या चित्रपटाला सध्या 'AA22xA6' असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे.

अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार?विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत. जर अनुष्का शर्माने या चित्रपटासाठी होकार दिला, तर हे तिचा तेलुगू चित्रपटसृष्टीतील पहिला डेब्यू ठरेल. 

लंडनमध्ये स्थायिक आहे अनुष्का

अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिका आणि मुलगा 'अकाय' यांच्यासह लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. ती शेवटची तृप्ती डिमरीच्या 'कला' (Qala) या चित्रपटात एका छोट्या पाहुण्या भूमिकेत दिसली होती. आता ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अनुष्का पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार का, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Anushka Sharma comeback? Big screen entry with 1800 crore movie?

Web Summary : Anushka Sharma may return to the big screen after a long break, potentially starring alongside Allu Arjun and Deepika Padukone in Atlee's upcoming film. This could mark her Telugu debut.
टॅग्स :अनुष्का शर्माअल्लू अर्जुनविराट कोहली