Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहणार का लिव्हइनमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 17:09 IST

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण काही नवीन नाही. ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हे लव्ह बर्डस देहदानूला ...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण काही नवीन नाही. ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हे लव्ह बर्डस देहदानूला गेले होते. तिथे हे दोघे साखरपुडा करणार असल्याची बातमी आली होती. मात्र विराट या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. आमचा सध्या तरी असा काही प्लॅन नसल्याचे तो म्हणाला.न्यू इअरचे सेलिब्रेशन करुन पतरलेले हे कपल मुंबईतल्या वरळीमध्ये घर शोधताना दिसले.वरळीतल्या ओंकार टॉवरमध्ये या दोघांच्या पसंतीने फ्लॅटचे काम सुरु असल्याचे समजतेय. भलेही विराट आणि अनुष्कान साखरपुडा करत नसले तरी ते आपल्या नात्याला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाताना दिसतायेत. एका वर्षा पूर्वी त्यांना हा फ्लॉट बुक केल्याची माहिती मिळतेय.  विराट आणि अनुष्काचे हे फोटो सध्या सोशलमीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावरुन बी टाऊनमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिव्हनमध्ये राहणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.  धोनी कर्णधार पदावरुन निवृत्त झाल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाची धुरा आली आहे.