Join us

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली परदेशात मुलांसाठी स्वतः बनवतात जेवण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:44 IST

Anushka Sharma : अनुष्का शर्मा सध्या भारतात परतली आहे. तेव्हापासून सातत्याने ती चर्चेत आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या भारतात परतली आहे. तेव्हापासून सातत्याने ती चर्चेत आहे. भारतात परतल्यानंतर मुंबईत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले. ती कशी तिचा नवरा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli), मुलं वामिका आणि अकायसाठी जेवण बनवते. कारण आईचं जेवण मुलांपर्यंत पोहचवू शकेल. तिने मुलांचं रुटीनच्या प्लानिंगबद्दल सांगितले आहे.

इव्हेंटमध्ये अनुष्का शर्मा म्हणाली की, आमच्या घरी ही चर्चा होती की जर आम्ही आपल्या आईने बनवलेले जेवण घरी नाही बनवले तर ते पदार्थ कधीच आपल्या मुलांना देऊ शकणार नाही. त्यासाठी मी कधी कधी जेवण बनवते आणि कधी कधी माझा नवरादेखील जेवण बनवतो. आम्ही तेच परत करण्याचा प्रयत्न करतो जे आमच्या आईने आमच्यासाठी केले होते. मी माझ्या आईला फोन करून रेसिपी विचारते कारण हे गरजेचे आहे. हे आपल्या मुलांना काहीतरी मोल्यवान गोष्ट देण्यासारखे आहे. 

मुलांचं असं बनवलं रुटीनअनुष्का म्हणाली की, मी रुटीनच्या बाबतीत खूप स्ट्रीक्ट आहे. आम्ही खूप फॅमिली ट्रीपवर जातो आणि माझी मुलं हे सगळं खूप एन्जॉय करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक बनवून मी त्यांना कंट्रोलची फिलिंग देत आहे. जेवणाची वेळ निश्चित आहे. मग आम्ही कुठेही असलो तरी आम्ही एका वेळी खातो आणि एका वेळी झोपतो. यामुळे त्यांना चांगल्यारितीने स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळेल.

युकेत शिफ्ट झालेत का अनुष्का-विराट?अनुष्का यावेळी तिच्या मुले आणि विराट कोहली शिवाय भारतात परतली आहे. मुलगा अकायच्या जन्मानंतर ती दुसऱ्यांदा भारतात आली आहे. ती पहिल्यांदा मे महिन्यात आयपीएलसाठी भारतात आली होती. असं सांगितलं जातं की, विराट आणि अनुष्का युकेत शिफ्ट झाले आहेत आणि लंडनच्या रस्त्यावर हे कपल बऱ्याचदा फिरताना दिसतात.

वर्कफ्रंटअनुष्का शर्मा २०१८ साली झिरो सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात झळकली नाही. ती चकदा एक्सप्रेसमध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे.   

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली