Join us
Daily Top 2Weekly Top 5

​इटलीतील ‘या’ शानदार व्हिलामध्ये होणार अनुष्का -विराटचा शाही विवाह सोहळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:29 IST

क्रिकेटच्या मैदानावर वा एखाद्या इव्हेंटमध्ये अनुष्का शर्मा व विराट कोहलीची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी चाहते प्रतीक्षा करायचे. पण ...

क्रिकेटच्या मैदानावर वा एखाद्या इव्हेंटमध्ये अनुष्का शर्मा व विराट कोहलीची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी चाहते प्रतीक्षा करायचे. पण आता या जोडीच्या वेडिंग वेन्यूची झलक पाहायला मिळावी, यासाठी चाहते प्रतीक्षा करत आहेत. चला तर, तुमची ही प्रतीक्षा आम्ही संपवतोय. होय, हे रॉयल वेडिंग सुरु होण्यापूर्वी ते कुठे होणार, याचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथितरित्या इटलीतील याच ठिकाणी अनुष्का व विराट साताजन्माची गाठ बांधणार आहेत.चर्चा खरी मानाल तर अनुष्का व विराट दोघेही इटलीतील टसक्नी येथे लग्न करणार आहेत. मॉडर्न व्हिलाच्या रूपात तयार या जुन्या कॅसल प्रॉपर्टीमध्ये विरूष्काचे रॉयल वेडिंग होणार आहे. फोटोत दिसत असलेल्या याच व्हिलाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.हा आहे, व्हिलाकडे जाण्यासाठीचा रस्ता. वाइन यार्डच्या मधोमध हा रस्ता बनवण्यात आला आहे.विरूष्काच्या पाहुण्या या वाइन यार्डम्ये ओपेन डाईनिंगचा आनंद घेता येईल.वेडिंग प्लानर्स या अ‍ॅडवेंचरलाही लग्न सोहळ्यात सामील करू शकतात. हे याठिकाणचे सगळ्यात शानदार अ‍ॅडवेंचर मानले जाते. या खास वेडिंग वेन्यूमध्ये केवळ स्विमींग पूलचं नाही तर जिमची व्यवस्थाही आहे. याशिवाय आऊटडोअर गेम्सची मेजवानीही असणार आहे. लग्नाचे व-हाडी या गेम्सचा आनंद घेऊ शकतात. चर्चा खरी मानाल तर अनुष्का व विराट येत्या १२  ते १५डिसेंबर दरम्यान इटलीत लग्न करणार आहे.  गुरुवारी रात्री हे लव्हबर्ड्स इटलीला रवाना झालेत.  अर्थात दोघांनीही वेगवेगळ्या शहरातून उड्डाण भरले.ALSO READ: ​अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लगीनघाई! हा घ्या पुरावा!!अनुष्काने  मुंबईतून फ्लाईट घेतली तर विराटने दिल्लीतून. यावेळी अनुष्का आपल्या कुटुंबासोबत दिसली. सूत्रांचे मानाल तर, हे लग्न इटलीत होणार आहे. विराटचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांनी आधीपासूनच इटलीसाठी तिकिट बुक केले आहे. विराटचे अगदी जवळचे मानले जाणारे कोच राजकुमार शर्मा यांनी यादरम्यान सुट्टी घेतल्याने या चर्चेला बळ मिळत आहे.  विराटही डिसेंबरमध्ये दीर्घ सुट्टीवर आहे. विराटने आपल्या खासगी कारणांमुळे दीर्घ सुट्टी घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. काही दिवसांपूर्वी विराट व अनुष्का दोघेही डिझाईनर सब्यसाची यांना भेटले होते. कदाचित ही भेट वेडिंग आऊटफिट सिलेक्शनसाठी असावी, असा अंदाज यानंतर बांधला जात आहे.