Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का म्हणतेय, ‘बहुत मजा आने वाला है’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 10:11 IST

बॉलिवूडची सौंदर्यवती अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर हँडलवरून ‘लिख कर रखो, बहुत मजा आने वाला है’ अशी पोस्ट करीत तिच्या ...

बॉलिवूडची सौंदर्यवती अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर हँडलवरून ‘लिख कर रखो, बहुत मजा आने वाला है’ अशी पोस्ट करीत तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित दुसरा चित्रपट ‘फिल्लोरी’ची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. हा चित्रपट २४ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्नेश यांची क्लिन स्टेट फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशाई लाल करीत आहे.फिल्लोरीमध्ये अनुष्का शर्मा सोबतच पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ, लाईफ आॅफ पाय मधील अभिनेता सूरज शर्मा आणि मेहरीन पीरजादा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुष्काने आपल्या ट्विटरवर हिंदीत लिहिलेय , ‘फिल्लोरीची रिलीट डेट : मार्च २४, २०१७ आहे, आतापासूनच... लिहून ठेवा : खूप मजा येणार आहे’}}}}अनुष्का शर्माने मागील वर्षी एनएच -१० या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फार कमाई केली नसली तरी अनुष्काने निवडलेला विषय व तिच्या अभिनयाची प्रसंशा झाली होती. यामुळे तिचा आगामी ‘फिल्लौरी’ हा चित्रपटही चांगलाच असेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. अनुष्काचा नुकताच प्रदर्शित झालेल्या करण जोहर निर्मित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर १२५ कोटीचा गल्ला जमविला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रसंशा झाली.