Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अनुष्कासाठी विराट पोहचला ‘सुलतान’च्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 14:52 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या भेटीगाठीच्या बातम्या सध्या सर्वत्र चर्चिल्या जात असून असेच आता एका भेटीच्या चर्चेला उधाण ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या भेटीगाठीच्या बातम्या सध्या सर्वत्र चर्चिल्या जात असून असेच आता एका भेटीच्या चर्चेला उधाण आले आहे. अनुष्कापासून जास्त वेळ लांब राहु शकत नसल्याने विराट अनुष्काला भेटायला चक्क अशा ठिकाणी गेल्या, तिथे त्याला पाहुन अनुष्का सुद्धा आश्चर्यचकित झाली.विराट अनुष्काला भेटण्यासाठी थेट सुलतान सिनेमाच्या सेटवर गेला होता. त्यांच्या भेटीची फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच अनुष्काला सोडण्यासाठी विराट एअरपोर्टवर गेला असल्याचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. विराटने अनुष्काला भेटल्यानंतर स्वत:चा फोटो शेअर केला होता. मात्र अनुष्काला भेटल्याचं जाहीर केलं नव्हतं.