‘सुल्तान’ च्या सेटवर अनुष्का-लुलियाची गट्टी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 11:14 IST
सलमान खान-लुलिया वंतुर यांच्या लग्नाच्या चर्चा गरम असतांना आणखी एक चर्चा चांगलीच रंगलीय. ती म्हणजे लुलियाची ‘सुल्तान’ च्या सेटवर ...
‘सुल्तान’ च्या सेटवर अनुष्का-लुलियाची गट्टी !
सलमान खान-लुलिया वंतुर यांच्या लग्नाच्या चर्चा गरम असतांना आणखी एक चर्चा चांगलीच रंगलीय. ती म्हणजे लुलियाची ‘सुल्तान’ च्या सेटवर अनुष्का शर्मासोबत चांगलीच गट्टी जमलीय म्हणे! वेल, आता तुम्हाला वाटलं असेल की, सलमानच्या जे लोक जास्त जवळचे आहेत त्यांच्यासोबत लुलिया चॅटींग वाढवते आहे का?तर तसे काहीही नाहीये. सलमान-अनुष्का यांनी नुकतेच बुडापेस्टमध्ये एक रोमँटिक गाण्याचे शूटींग करून परतले आहेत. त्यानंतर त्यांना लुलिया भेटायला आली. त्यावेळी दोघींचीही चांगलीच गट्टी जमली.अनुष्काने लुलियाला आता तिच्या घरी वांद्रे येथे बोलावले असून ती खास लुलियासाठी पार्टी आयोजित करणार असल्याचेही सांगितले आहे.