Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्काचा शेळीसोबतचा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 11:26 IST

 अनुष्का शर्मा प्राणीप्रेमी आहे. तिला पाळीव प्राणी प्रचंड आवडतात. तिच्याकडे तिचा एक पाळीव कुत्रा आहे ज्याचे नाव ‘ड्यूड’ असे ...

 अनुष्का शर्मा प्राणीप्रेमी आहे. तिला पाळीव प्राणी प्रचंड आवडतात. तिच्याकडे तिचा एक पाळीव कुत्रा आहे ज्याचे नाव ‘ड्यूड’ असे आहे. तिचे ‘सुल्तान’ च्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिचा शेळीसोबतच्या एका फोटोला प्रचंड लाईक्स मिळत आहे. ग्रामीण भागातील शूटींग यात दाखवण्यात आले आहे.उत्तर भारतातील काही ठराविक सुंदर ठिकाणामध्ये चित्रपट शूट करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटातून वास्तवता लक्षात येते. तिने पोस्ट केलेल्या या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की, सच अ क्युटी धीस वन. लव्ह थ्रोबॅक सुल्तान.’यानंतर फिलौरी चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि सुरज शर्मा यांच्यासोबत दिसणार आहे. तसेच ती करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर आणि फवाद खान यांच्यासोबत दिसणार आहे.