Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्काकडून दीपिका ‘आऊट’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 17:15 IST

बॉलीवुडचा किंग खान शाहरुखच्या आगामी सिनेमासाठी दोन नायिकांची नावं समोर येत होती. आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमासाठी अभिनेत्री ...

बॉलीवुडचा किंग खान शाहरुखच्या आगामी सिनेमासाठी दोन नायिकांची नावं समोर येत होती. आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव जवळपास कन्फर्म झालं होतं. दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं दीपिकाशी बोलणंही झालं होतं. मात्र कुठं माशी शिंकली अनं दीपिका या सिनेमातून आऊट झालीय. दीपिकाच्या जागी आता सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्माची वर्णी लागलीय. दिग्दर्शकांना सुलतान गर्लनं आकर्षित केलंय. त्यामुळं अनुष्काचं नाव या सिनेमात नक्की झालंय. सिनेमात दोन नायिका असून दुसरी नायिका कोण असेल याबाबतचा सस्पेन्स मात्र कायम आहे.