Join us

अनुष्का-दीपिका नाही तर आलिया भट्ट करणार शाहरुखसोबत रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 17:22 IST

आनंद एल राय यांच्या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत कोण अभिनेत्री नायिकेची भूमिका बजावणार हे अजून फायनल झालेले नाही. पण ...

आनंद एल राय यांच्या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत कोण अभिनेत्री नायिकेची भूमिका बजावणार हे अजून फायनल झालेले नाही. पण या सगळ्यात बॉलिवू़डची चुलबुली गर्ल आलिया भट्टचे नाव सगळ्यात आघाडीवर असल्याचे कळते आहे. डिअर जिंदगीमध्ये शाहरुखची पेंशट बनलेली आलिया आनंद एल रायच्या चित्रपटात शाहरुखसोबत आपल्याला रोमांस करताना दिसू शकेत.    सूत्रांच्या माहितीनुसार आलियाचे नाव या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले आहे. आलिया, शाहरुख आणि आनंद यांचे तिघांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होता येत त्यावरुन या चर्चांना उधाण आले आहे. याचित्रपटात कतरिना कैफला ही घेण्यात आले आहे. मात्र ती शाहरुखची नायिका नाही आहे. शाहरुखच्या नायिकेच्या भूमिकेसाठी सोनम कपूर, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांची नावे चर्चेत होती मात्र बाजी मारली ती आलिया भट्ट हिने.    सूत्रांची माहिती जर खरी ठरली तर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा आपल्याला किंग खानसोबत आलिया भट्ट रोमांस करताना दिसू शकते. आनंद एल राय यांच्या या बहुचर्चित चित्रपटाचे शूटिंग 'मे' च्या अखेरीस सुरु होऊ शकते. आलियाला डिअर जिंदगी चित्रपटात शाहरुखसोबत रोमांस करण्यास मिळाला नव्हता. त्यामुळे भविष्यात जर संधी मिळाली तर मी नक्कीच शाहरुख खानसोबत रोमांस करेन असे आलिया म्हणाली होती. त्यामुळे मिळालेल्या संधीचे आलिया नक्कीच सोने करेल यात काही शंका नाही. सध्या आलिया  सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेल्या नात्यामुळे बरीच चर्चा आहे. सिद्धार्थ आणि आलियाने आपले नाते कधीच उघडपणे स्वीकारले नाही. मात्र सर्वाजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये अनेक वेळा त्यांना एकत्र पाहण्यात आले आहे.