अनुष्का दांडेकर बॉयफ्रेंड करण कुंद्रासह व्हॅकेशन करते एन्जॉय,समोर आले PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 16:59 IST
अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्रासह सध्या साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत.नेहमी प्रमाणे या दोघांनी त्यांचे ...
अनुष्का दांडेकर बॉयफ्रेंड करण कुंद्रासह व्हॅकेशन करते एन्जॉय,समोर आले PHOTO
अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्रासह सध्या साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत.नेहमी प्रमाणे या दोघांनी त्यांचे व्हॅकेशन फोटो सोसळ मीडियावर शेअऱ केले आहेत.शेअर केलेल्या फोटोला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.खरंतर या दोघांनी कधीच आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला नाही. दरवेळी त्यांचे रोमँटीक फोटो त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. ते नेहमीच त्या दोघांचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत असतात. करण आणि अनुष्का त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून साऊथ आफ्रिकामध्ये सध्याएकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. आपल्या या रोमँटिक ट्रिपविषयी त्या दोघांनीच आपल्या फॅन्सला सोशल नेटवर्किंवरून माहिती दिली आहे.दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे त्यांचे फोटो पाहून जाणवते.करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. गेल्या काही वर्षापासून अनुष्का आणि करण एकमेकांना डेट करत आहेत.जेव्हा जेव्हा हे दोघे त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करतात तेव्हा तेव्हा दोघांचा अंदाज, स्टाईल सारं काही त्यांच्या फॅन्ससाठी लक्षवेधी ठरते.बॉडिंग,एकमेंकांवर असलेले प्रेम दोघांमध्ये वेळोवेळी पाहायला मिळतं.साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्याच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.खरंतर अनुष्काच्या प्रेमात पडण्याआधी करण कुंद्रा अनेक वर्षं कृतिका कामराच्या प्रेमात कितनी मोहब्बत है या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असे. पण कितनी मोहोब्बत है ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.एवढेच नव्हे तर क्रितिका आणि अनुष्का या दोघीदेखील एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.Also Read:करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकरसोबत माझी चांगली मैत्री असे सांगतेय क्रितिका कार्माला