Join us

‘ऐ दिल...’ मधील अनुष्का-रणबीरचा न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 10:16 IST

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर काल आऊट करण्यात आला होता. टीझर पाहिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ...

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर काल आऊट करण्यात आला होता. टीझर पाहिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ट्रेलर केव्हा आऊट होतो? याकडे लागले आहे. चित्रपट दिवाळीला रिलीज होणार आहे.चित्रपटाची टीम देखील चाहत्यांची आणखी उत्सुकता वाढविण्यासाठी न्यू स्टील्स आऊट क रत आहेत. नुकताच एक स्टील आऊट करण्यात आला आहे.ज्यात अनुष्का क्युट पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तर रणबीर तिच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. या दोघांशिवाय चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन आणि फवाद खान हे देखील असतील.