Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘उडता पंजाब’च्या प्रेक्षकांना अनुरागची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:25 IST

सेन्सॉरच्या धडपशाहीच्या धोरणाला न्यायालयीन फटका देत ‘उडता पंजाब’ बाबतचा आपला हक्क अनुराग कश्यपने मिळविला, मात्र तरीही काही अडचणींचा सामना ...

सेन्सॉरच्या धडपशाहीच्या धोरणाला न्यायालयीन फटका देत ‘उडता पंजाब’ बाबतचा आपला हक्क अनुराग कश्यपने मिळविला, मात्र तरीही काही अडचणींचा सामना करावाच लागत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची 'सेन्सॉर' कडे दिलेली कॉपी लीक झाली. सेन्सॉर बोर्डाकडूनच हा चित्रपट लीक झाल्याच्या चचार्ही सुरु आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हा चित्रपट लीक करणाºयाची ओळख पटली असून संबंधीत व्यक्तीला लवकरच अटक होऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे. पण, याचा फटका सिनेमाला आणि सिनेमाशी निगडीत व्यक्तींना बसणार हे नक्की... यामुळेच अनुरागनं आपल्या प्रेक्षकांकडे एक विनंती केली आहे. यात तो म्हणतोय, 'की तुम्हाला टोरंटवरून सिनेमा डाऊनलोड करायचा असेल तर मी तुम्हाला थांबवू शकणार नाही... पण, शनिवारपर्यंत थांबा... स्वत: च्या हक्कासाठी लढणाºया लोकांना दबवण्याचा हा प्रयत्न आहे'.