Join us

शाहरूखसोबत फोनवर बोलतानाही उभा राहतो अनुराग कश्यप, सोबत काम का केलं नाही हेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:32 IST

जर अनुराग आणि शाहरूखचं नातं इतकं चांगलं आहे तर मग तो शाहरूखसोबत तो काम का करत नाही? याबाबत अनुरागने त्याच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

Anurag Kashyap : शाहरूख खानचा (Shahrukh Khan) सिनेमा 'पठाण' बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडत जोरात सुरू आहे. 10 दिवसात हा सिनेमा ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला आहे. गॅंग्स ऑफ वासेपूर आणि देवी डी सारखे सिनेमे बनवलेला डायरेक्टर अनुराग कश्यप यानेही पठाणसाठी शाहरूख खानचं भरभरून कौतुक केलं आहे. 

अनुरागने पठाण पहिल्याच दिवशी पाहिला. यावेळी शाहरूखचा लूक, त्याचं काम याबाबत तो खूप काही बोलला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता एका नव्या मुलाखतीत अनुरागने सांगितलं की, त्याचं आणि शाहरूख खानचं नातं फार चांगलं आहे. आणि तो शाहरूखचा इतका सन्मान करतो की, त्याचा फोन आला तर तो खुर्चीवरून उठून उभा राहतो आणि मग बोलतो.

जर अनुराग आणि शाहरूखचं नातं इतकं चांगलं आहे तर मग तो शाहरूखसोबत तो काम का करत नाही? याबाबत अनुरागने त्याच्या मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणाला की, शाहरूखचं आणि त्याचं नातं फार जुनं आहे. पण प्रोफेशनली त्याची चॉईस वेगळी आहे.

शाहरूखसोबत अजून काम का केलं नाही याबाबत अनुराग म्हणाला की,  'खूप वेळा विचार केला. तो कॉलेजमध्ये मला सीनिअर होता. त्याचा मला फोन येतो तेव्हा मी बोलताना उभा राहतो. त्याने माझ्याबाबत हार मानली आहे. ते यासाठी की, त्याला वाटतं मला अजून कळालेलं नाही की, माझं काही होऊ शकत नाही. तो मोठ्या भावासारखा सांगतो की, मी काय करू नये, मी काय बोलू नये, ट्विटरवर मी का असू नये'.

अनुरागने सांगितलं की, त्याच्याकडे शाहरूखसोबत काम करण्याच्या अनेक ऑफर आल्या होत्या. पण त्याने नकार दिला. तो म्हणाला की, 'त्याचे अनेक प्रोजेक्ट आले होते माझ्याकडे. अशोका माझ्याकडे लिहिण्यासाठी आली होती. मी तेव्हापासून त्याला थोडा अवॉइड करतो. तो शाहरूख खान आहे यार...त्याचं एक स्टारडम आहे. मला जसे सिनेमे बनवायचे आहेत, मी तसेच बनवणार'.

अनुराग म्हणाला की, 'केवळ शाहरूख खानच नाही तर जेही मला जवळून ओळखतात ते मला असाच सल्ला देतात. मी त्यांच्या सगळ्यांपासून दूर पळतो. कारण मला तसं जगायचंच नाहीये. मी जसं हवं तसा जगतो. जे आवडतं ते खातो. जगभरातील सगळ्यात चांगली कॉफी शोधून शोधून पितो. अनुराग म्हणाला की, अशाप्रकारे आपल्या मनाने जगताना अनेकदा त्याला पैशांची चणचण भासते. पण त्याला असंच जगणं आवडतं.

टॅग्स :अनुराग कश्यपशाहरुख खान