दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशी ओळख असलेला बहुगुणी अनुराग कश्यपने धक्कादायक खुलासा केला आहे. २००९ पासून तो 'मॅक्सिमम सिटी' सिनेमाची तयारी करत होता तो अचानक नेटफ्लिक्सने रद्द केला. सुकेतू मेहता यांच्या २००४ साली आलेल्या 'मॅक्सिमम सिटी बॉम्बे लॉस्ट अँड फाउंड'वर ही सीरिज आधारित होती. नेटफ्लिक्सने अचानक माघार घेतल्याने अनुराग कश्यपला हा धक्का सहनच झाला नाही. त्याला हदयविकाराचा झटका आला असा खुलासा त्याने नुकताच केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला, "मॅक्सिमम सिटी रद्द झाल्याने मी निराश होतो कारण यात मी बरीच गुंतवणूक केली होती. २००९ पासून मी या सिनेमाची तयारी करत होतो. नेटफ्लिक्सने आधी प्रोजेक्टसाठी हिरवा झेंडा दाखवला होता. मी त्यांना म्हणालो की, 'प्लीज तुम्ही ते पुस्तक वाचा'. पण टीममधील एक माणूस सोडला तर कोणीही ते पुस्तक वाचलं नाही. दीड वर्ष काहीच रिप्लाय आला नाही. हा प्रोजेक्ट करणार नाही असं कोणीच मला येऊन सांगितलं नाही त्यामुळे मी आणखी जास्त परेशान झालो होतो."
तो पुढे म्हणाला, "त्या घटनेमुळे मला हृदयविकाराचा झटका आला. मी ब्लड थिनींगसाठी औषधं घेत होतो. एका व्हॅक्सीनने माझ्यावर वाईट परिणाम केला. मला अस्थमा झाला म्हणून मी स्टेरॉइडवर होतो. माझं डोकं फिरलं होतं. मी सतत प्यायचो आणि डिलीव्हरी अॅपवरुन काही ना काही खाण्यासाठी ऑर्डर करायचो. माझी पिण्याची सवय खूप वाढली होती. बरा होण्यासाठी मी रिहॅबमध्येही गेलो. नंतर माझ्या पायाला दुखापत झाली परिस्थिती आणखी चिघळली. ब्लड थिनर घेत असल्याने सर्जरीही करता येत नव्हती."
"एक घटना अशाप्रकारे वैयक्तिक ट्रॅजेडीमध्ये बदलली. एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्ही इतका वेळ देता तेव्हा ते प्रोजेक्ट तुमचं बाळ असल्यासारखंच असतं. त्यामुळे माझ्यासाठी ती घटना मिसकॅरेज सारखी होती. नशिबाने झोया अख्तरने मला फोन केला. 'मेन इन हेवन'मध्ये काम करणार का? असं तिने मला विचारलं. सुरुवातीला मी आरोग्याच्या गोष्टींमुळे जरा संकोचत होतो. मी म्हणालो, 'मी आत्ता बेडवर पडलेलो आहे. पायात सेन्सेशनही नाहीये मी व्हीलचेअरवर आहे.' तर ती म्हणाली की आपण सीनमध्ये व्हीलचेअर दाखवू.' अशा प्रकारे मी खोलीतून बाहेर पडलो आणि पुन्हा कामाला लागलो."
अनुराग कश्यपने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'कॅनेडी' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. झी५ वर सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमात राहुल भट आणि सनी लियोनी मुख्य भूमिकेत आहे.
Web Summary : Anurag Kashyap suffered a heart attack after Netflix canceled 'Maximum City'. He was already taking blood thinners, steroids, and drinking heavily. Zoya Akhtar offered him 'Made in Heaven', helping him recover and return to work. His film 'Kennedy' will soon be released.
Web Summary : अनुराग कश्यप को नेटफ्लिक्स द्वारा 'मैक्सिमम सिटी' रद्द करने के बाद दिल का दौरा पड़ा। पहले से ही ब्लड थिनर, स्टेरॉयड ले रहे थे और शराब पी रहे थे। ज़ोया अख्तर ने उन्हें 'मेड इन हेवन' ऑफर किया, जिससे उन्हें ठीक होने और काम पर लौटने में मदद मिली। उनकी फिल्म 'कैनेडी' जल्द ही रिलीज होगी।