दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘चोक्ड- पैसा वसूल’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झालाये. सैयामी खेर आणि रोशन मॅथ्यूची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण हा सिनेमा अनुरागने का बनवला माहितीये? तर त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी. होय, केवळ आणि केवळ गर्लफ्रेन्ड शुभ्रा शेट्टी हिच्यासाठी.एका ताज्या मुलाखतीत खुद्द अनुरागने हा खुलासा केला. ‘चोक्ड- पैसा वसूल’ हा सिनेमा मी शुभ्राला समर्पित करतो. तिच्यामुळे आणि तिच्याचसाठी हा सिनेमा मी बनवला, असे अनुरागने सांगितले. याचे कारणही त्याने सांगितले.
तो म्हणाला, 2015 साली शुभ्रा ‘चोक्ड- पैसा वसूल’ची कथा माझ्याकडे घेऊन आली होती. शुभ्रा फार सिनेमे पाहत नाही. चित्रपट पाहिल्याने तिला त्रास होतो, असे ती म्हणते. 2015 मध्ये ती ‘चोक्ड- पैसा वसूल’ची कथा घेऊन आली आणि तू हा सिनेमा बनवला तर मी नक्की बघेन, असे मला म्हणाली. तिने माझा सिनेमा पाहावा, म्हणून मी हा सिनेमा बनवला. तिला थँक्यू म्हणण्यासाठी मी तो बनवला. आता तिने माझा सिनेमा बघितलाय आणि मी खूप आनंदी आहे.
दोन घटस्फोटानंतर अनुराग स्वत:हून 22 वर्षांनी लहान शुभ्राच्या प्रेमात पडला आहे. 2003 मध्ये अनुरागचे पहिले लग्न झाले. आरती बजाजसोबत अनुरागने लग्न गाठ बांधली. पण 2009 मध्ये त्याचा व आरतीचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्री कल्की कोच्लीनच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केले. पण पाच वर्षांत कल्कीसोबतही त्याचा घटस्फोट झाला.दोन घटस्फोटानंतर अनुराग शुभ्रासाठभ वेडा झाला. डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. यानंतर जुलै २०१६ मध्ये अनुराग व शुभ्राच्या रिलेशनची चर्चा झाली होती. यावेळी दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात अनुराग शुभ्राचे चुंबन घेताना दिसला होता.
डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शुभ्राचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. अर्थात अफेअरच्या या बातम्यांनी अनुराग चांगलाच संतापला होता. केवळ संतापलाच नाही तर त्याने या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. पण नंतर एका मुलाखतीत त्याने या नात्याची कबुली दिली होती.