Join us

अनुराग कश्यपला आवडतो रामगोपाल वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 15:12 IST

रामगोपाल वर्मा आपणास आवडतो, असं अनुराग कश्यपने म्हटले आहे. ‘अनुराग मला आवडतो, तोच माझा दु:स्वास करतो. मी त्याच्यावर प्रेम ...

रामगोपाल वर्मा आपणास आवडतो, असं अनुराग कश्यपने म्हटले आहे. ‘अनुराग मला आवडतो, तोच माझा दु:स्वास करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तो मला पसंत करीत नाही.’ असे वीरप्पनच्या ट्रेलर लाँचप्रसंगी रामगोपाल वर्मा यांनी सांगितले होते,याबाबतीत विचारले असता अनुराग म्हणाला, ‘तो असा विचार करतो तर! तो माझ्यावर जितके प्रेम करतो, तितकेच मी त्याच्यावर करतो. किंबहुना मी अधिक करतो.’ शूल, कौन, सत्या या रामगोपाल वर्मा यांच्या चित्रपटातून अनुराग कश्यप यांनी पटकथा लिहिल्या. कश्यप हे उडता पंजाब या चित्रपटाचे निर्माता आहेत. कश्यप यांनी आपल्या चित्रपटावर बंदी आणू नये, असे ट्विट केले होते. ‘तुम्ही माध्यमांचे लोक उगीचच वाद निर्माण करता. तुम्हीच मला उपाय सुचवा. तुम्ही या चित्रपटावर बंदी आणल्याचे सांगितले. या चित्रपटावर ना बंदी आहे ना काही घडले आहे. तुम्हाला खरे काहीही माहिती नाही. काहीही घडलेले नाही. सर्व काही सुरळीत आहे.’ असे कश्यप यांनी सांगितले.