Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का विराटसोबत जाणार का कॅरिबिअनला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:39 IST

अनुष्का शर्मा-विराट कोहली हे कपल बॉलीवूडमधील सर्वांत हॉट दिसतेय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या चांगल्याच रंगत होत्या. मात्र, आता ...

अनुष्का शर्मा-विराट कोहली हे कपल बॉलीवूडमधील सर्वांत हॉट दिसतेय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या चांगल्याच रंगत होत्या. मात्र, आता ते दोघेही पुन्हा एकत्र आल्याचे दिसते आहे. ‘कॅरिबिअन’ येथे चौथी टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम तयार झाली आहे.  ३ आॅगस्ट येथील ‘जमैका’ मध्ये झालेल्या दुसºया मॅचनंतर खेळाडू त्यांच्या   पत्नी, गर्लफ्रेंड यांना भेटणार असल्याचे कळाले आहे. यात अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेटेश्वर पुजारा, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी यांच्या पत्नी येणार आहेत.मग, आता सर्वांना प्रश्न पडलाय की, अनुष्का शर्मा त्याला जॉईन करणार की नाही? वेल, आता ती जाणार की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थांबावंच लागणार आहे. पण अनुष्का विराटसाठी चिअर करते आहे हे पहायला नक्कीच आपल्याला आवडेल.