Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय? आलियाच्या प्रश्नावर आईने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:41 IST

'फादर्स डेच्या दिवशी अनुराग कश्यप यांच्यासह मुलगी आलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता.तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत आली आहे.

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून  'टॅबू' समजल्या जाणाऱ्या विषयांना आलियाने वाचा फोडली आहे. 'फादर्स डेच्या दिवशी अनुराग यांच्यासह मुलगी आलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत आलियाने अनुरागला  सेक्स, रिलेशनशिप आणि प्रेग्नन्सी या विषयांवर प्रश्न विचारले होते. अनुरागनेही मनमोकळेपणाने आलियाने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली होती. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांच्या भुवया उंचवाल्या होत्या. आता आलियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. 

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आईसोबत चर्चा करताना दिसत आहे. आईची या विषयाबद्दल मतं काय आहेत हे जाणून घेतले. आलियाने यावेळी आईलाही असेच काही प्रश्न विचारले आहेत.आलियाने आईला प्रश्न विचारला की, डेटिंगचं योग्य वय काय? यावर आरती बजाज यांनीही आलियाच्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.आलिया इथवरच थांबली नाही तर तिने आईला पहिल्यांदा सेक्स करण्याबाबत म्हणजेच व्हर्जिनिटी गमावण्याबाबतही प्रश्न विचारला यावरही आरती यांनी खूप चांगल्याप्रकारे उत्तर दिलं.

त्यानंतर आलियाने पुन्हा एकदा आईलाही प्रेग्नंसीबद्दल प्रश्न विचारला. चुकून मी कधी प्रेग्नन्ट झाले तर आई म्हणून तुझी प्रतिक्रिया काय असेल?' यावर उत्तर देताना आरती म्हणाल्या, बाळाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी असते.सगळ्यात आधी तुला तुझे आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे. स्वावलंबी व्हायला हवं. माझ्या मते ३० वर्षांचे होण्याआधी बाळाला जन्म देणे हा निर्णय चुकीचाच.योग्य वेळीच योग्य गोष्टी होणे आयुष्यात तितकेच महत्त्वाचे असते.

टॅग्स :अनुराग कश्यप