Join us

घटस्फोटानंतर अनुराग कश्यप आणि एक्स-वाईफ कल्की असा साधतात एकमेंकाशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 12:27 IST

२००९ मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती.

लॉकडाऊनमध्ये अनुराग कश्यमने नेटफ्लिक्सवरील ‘चोक्ड- पैसा बोलता है’सिनेमाचे नेटफ्लिक्स रिलीज करण्याआधी एक भव्य प्रीमियर करावा. म्हणून सिनेमाच्या स्ट्रिमिंग आधी काही जवळच्या मित्रांना हा सिनेमा दाखवण्यात आला. अनुरागची पूर्व पत्नीी कल्कि कोच्लीनला सुद्धा अनुराग सिनेमा पाहण्याचे निमंत्रण देतो. इतकेच नाही तर चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्याची वेळ आली  तेव्हा अनुरागला होस्ट करण्सास सांगण्यात आले तेव्हा कल्किने समोर येऊन चित्रपटाविषयी आपलं मतं मांडले. कल्की म्हणाली की, तिला अनुरागने या चित्रपटात कुणाचीही हत्या नाही केले हे आवडले. 

२००९ मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. चोक्डची कथा सरिता पिल्लई (सैयामी खेर) आणि सुशांत पिल्लई (रोशन मॅथ्यू) या जोडप्याची कहाणी आहे. सुशांत कुठलेही काम करत नसल्याने सरिताच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. सरिता एका बँकेत नोकरी करून घराचा गाडा हाकत असते. सुशांतच्या डोक्यावर काही कर्जही असते. अशात या जोडप्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त असे चित्र असते़.घरासाठी स्वप्नांवर पाणी सोडलेली सरिता वैतागली असते. एका लहानशा घरात ती राहत असते.

टॅग्स :अनुराग कश्यपकल्की कोचलीन