अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलिवूडमधील आदर्श कपल. खरं तर या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. पण, तरीही त्यांनी त्यांचं नातं पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केला आहे. अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न करत संसार थाटला. तेव्हा किरण खेर यांना पहिल्या पतीपासून सिकंदर हा ४ वर्षांचा मुलगा होता. त्याच्यासाठी अनुपम यांनी कायमच पित्याची भूमिका निभावली. मात्र त्यांना स्वत:च्या अपत्याचं सुख मिळालं नाही.
लग्नाच्या ४० वर्षांनंतर एका मुलाखतीत अनुपम यांनी याबद्दल भाष्य केलं. राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:चं अपत्य नसण्याबाबत खंत व्यक्त केली. वडील न होऊ शकण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "मी मुलांसोबत काम करतो. माझं फाऊंडेशनही मुलांसाठी काम करतं. मला मुलं खूप आवडतात. से समथिंग टू अनुपम अंकल नावाचा मी शोदेखील करायचो".
"किरण प्रेग्नंट होऊ शकत नव्हती. आणि जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा मुलाची वाढ नॉर्मल मुलांसारखी व्यवस्थित होत नव्हती. जेव्हा मी किरणसोबत लग्न केलं तेव्हा सिकंदर ४ वर्षांचा होता. तेव्हा तो माझ्या आयुष्यात आला होता. पण तेव्हा मी माझ्या करियरमध्ये बिझी होतो. मी बिझी होतो आणि सिकंदर खूप चांगला...मला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवलेली नाही", असंही ते म्हणाले.
अनुपम खेर यांनी मूल होण्यासाठी प्रयत्न केल्याचंही एका मुलाखतीत म्हटलं होतं. "आम्ही खूप प्रयत्न केले. सिकंदरला एक भाऊ किंवा बहीण हवी होती. म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही डॉक्टरचीही मदत घेतली होती. मात्र तरीही काही होऊ शकलं नाही", असं अनुपम खेर यांनी सांगितलं.