Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम खेर राजकीय नेत्याच्या भूमिकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 17:30 IST

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर हा ‘वेलकम बॅक गांधी’ या आगामी चित्रपटात एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता एस.कनगरज ...

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर हा ‘वेलकम बॅक गांधी’ या आगामी चित्रपटात एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता एस.कनगरज यांनी महात्मा गांधीची भूमिका केली असून अनुपम खेर एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.महात्मा गांधी यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. महात्मा गांधी जर आज भारतात आले असते तर कशाप्रकारचे वातावरण त्यांनी पाहिले असते याभोवती फिरणारे याचे कथानक आहे. सामाजिक आणि राजकीय घटनांवर आधारित चित्रपट असेल.