Join us
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग : अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोना; भाऊ, वहिनी, पुतणीलाही झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 11:27 IST

अनुपम खेर यांनी स्वत: एक व्हिडीओ जारी करत ही माहिती दिली आहे. 

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच नाही तर त्यांचा भाऊ, वहिनी आणि पुतणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुपम खेर यांनी स्वत: एक व्हिडीओ जारी करत ही माहिती दिली आहे. माझी आई जिला तुम्ही दुलारी नावाने ओळखता ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली असल्याचे अनुपम यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.

अनुपम खेर व्हिडीओत म्हणाले,मित्रांनो, माझी आई जिला तुम्ही दुलारी नावाने ओळखता ती गेल्या काही दिवसांपासून काहीही खात-पीत नव्हती. तिची प्रकृती बघता डॉक्टरांनी आम्हाला तिची कोरोना टेस्ट करण्याचे सुचवले. तिची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे आईसोबत होतो. त्यामुळे आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट झाली. माझ्या भावाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. माझी टेस्ट मात्र निगेटीव्ह आली. भावाच्या कुटुंबाचीही टेस्ट करण्यात आली. यात माझी वहिनी आणि माझी पुतणी या दोघींनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. माझा पुतण्या मात्र निगेटीव्ह आढळला. माझ्या आईला कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही बीएमसीला कळवण्यात आले आहे. याबाबत मी तुम्हाला माहित देणे, माझे कर्तव्य आहे. तुम्हीही तुमच्या कुटुंबातील वडिलधा-या माणसांची प्राधान्याने चाचणी करा. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व प्रार्थनांनी माझे कुटुंबीय लवकरच या आजारातून बरे होईल, असा मला विश्वास आहे, असे अनुपम खेर यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

टॅग्स :अनुपम खेर