Join us

‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:37 IST

सध्या अनुप स्वत:ची इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे आणि या प्रयत्नात अलीकडे त्याने एक फोटोशूट केले. या फोटोत त्याला ओळखणेही कठीण आहे.

‘क्राईम पेट्रोल’मधून अनुप सोनी घरा-घरात लोकप्रीय झाला. अनुप सोनीने तब्बल ८ वर्षे हा शो होस्ट केला. काही महिन्यांपूर्वी अनुपने या शोला अलविदा म्हटले. याचे कारण म्हणजे, अ‍ॅक्टिंग. होय, अनुप सोनीला त्याचे पहिले पे्रम म्हणजे अभिनय खुणावू लागला होता. त्यामुळे त्याने क्राईम पेट्रोल सोडण्याचा निर्णय घेतला आणि कदाचित अनुप सोनीचा हा निर्णय योग्य ठरला. होय, ‘क्राईम पेट्रोल’नंतर  अनुपचा मेकओव्हर पाहून तुम्हीही हे मानाल. 

सध्या अनुप स्वत:ची इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे आणि या प्रयत्नात अलीकडे त्याने एक फोटोशूट केले. या फोटोत त्याला ओळखणेही कठीण आहे.

ताज्या मुलाखतीत अनुपने याबद्दल खुलासा केला. माझ्या आतील एक अभिनेता खूप भुकेला होता. त्यामुळे मी वेगवेगळ्या भूमिकेत फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला,असे त्याने सांगितले. 

मेकओव्हरदरम्यान अनुपने जिममध्ये खूप घाम गाळला. त्यामुळे त्याची बॉडी कमालीची टोन्ड दिसतेय. तो आधीपेक्षा अधिक फिट दिसू लागलाय. अनुप सोनी टीव्ही जगतातील एक लोकप्रीय चेहरा आहे.

 अनेक हिट टीव्ही शोमध्ये तो दिसला. यापैकी एक म्हणजे, ‘बालिका वधू’. यात त्याने पित्याची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘ कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘साया’,‘सीआयडी’,‘आहट’,‘रात होने को है’,‘शांति’ अशा अनेक मालिकांतही तो दिसला आहे.  ‘फिजा’, ‘दस कहानियां’, ‘फुटपाथ’,‘राज’, ‘दिवानापन’,‘अपहरण’ आदी चित्रपटांत त्याने काम केले आहे.

 संजय दत्तचा निर्मिती असलेला तेलुगू 'प्रस्थानम' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अनुप झळकणार आहे. तेलुगू सिनेमाचे दिग्दर्शक देवा कट्टा  या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.  सिनेमाच्या पहिल्या भागाचे  शूटिंग पूर्ण झाल्याचे समजते.