Join us

​अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नवे ‘प्रेम’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 14:59 IST

गतवर्षी अचानक सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी येऊन धडकली, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. ...

गतवर्षी अचानक सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी येऊन धडकली, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. ब्रेकअपपूर्वी सहा वर्षे सुशांत व अंकिता एकमेकांना डेट करत होते.  ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली. पण असे काहीही नसल्याचे खुद्द सुशांतनेच स्पष्ट केले. यानंतर सुशांत व क्रिती सॅनन यांच्या अफेअरच्या बातम्या रंगल्या. या बातम्यांवरून तरी सुशांत अंकिताला विसरला,असे म्हणता येईल. पण अंकितासाठी सुशांतला विसरणे इतके सोपे नाही, असेही म्हटले गेले. अर्थात काळासोबत कितीही मोठी जखम भरते. अंकिताबद्दलही असेच म्हणता येईल.  केवळ सुशांतच नाही तर अंकिता सुद्धा तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलीय. होय, अंकिताच्या आयुष्यात नव्या व्यक्तिने एन्ट्री केलीय. अंकिता विकास जैन नामक एका बिझनेसमॅनला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकास जैनला सगळे विक्की नावाने ओळतात. विक्की हा बॉक्स क्रिकेट लीगमध्ये मुुंबई टीमचा को-ओनर आहे. बॉलिवूडमध्येही त्याचे अनेक मित्र आहे. ALSO READ : SHOCKING !! ​अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!सूत्रांच्या मते, अंकिता व विकास गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. टीव्ही इंडस्ट्रीच्या काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. पण अलीकडे दोघेही परस्परांच्या अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळते आहे. दोघांची बॉडी लँग्वेज बघून तरी तसेच वाटतेय. अलीकडे होली सेलिब्रेशनमध्ये दोघेही सोबत दिसले होते. यापूर्वी विकास व टीया वाजपेयी यांच्या डेटिंगच्या बातम्याही आल्यात. अंकिताचे म्हणाल तर तिचे नावही करण मेहरासोबत जोडले गेले. पण अंकिता व करण दोघांनीही याचा इन्कार केला. पण विकासबद्दल अंकिता सिरिअस वाटतेय. बघू यात पुढे काय होते ते!