Join us

​संजय दत्तच्या ‘या’ टोमण्यावर सलमान खान देणार का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:37 IST

अभिनेता संजय दत्त म्हणजे बॉलिवूडचे अजिब रसायन. कधी कुठे आणि कुठल्यावेळी तो काय बोलेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी ...

अभिनेता संजय दत्त म्हणजे बॉलिवूडचे अजिब रसायन. कधी कुठे आणि कुठल्यावेळी तो काय बोलेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी नशेत असतांना त्याने ‘मुन्नाभाई3’चे डिटेल्स लीक केलेत. अगदी काल-परवा रणबीर कपूरबद्दलही तो असाच काही बोलला होता.  माझ्या बायोपिकमध्ये रणबीर भूमिका करतोय. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने मला वैताग आणलाय. माझ्यासोबत वेळ घालवायसाठी तो मला रोज फोन करतो, असे काय काय संजय बडबडला होता. आता त्याने बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला डिवचले आहे. आता यावेळी संजय नशेत होता वा नाही, हे आम्हाला ठाऊक नाही. पण यावेळी संजयने सलमानला चांगलाच टोमणा मारला.अलीकडे एका मुलाखतीतला हा प्रसंग. या मुलाखतीदरम्यान संजय रॅपिड फायर राऊंड खेळायचा होता. या राऊंडमध्ये संजयला बॉलिवूडच्या काही लोकांची नावे सांगितली गेली आणि संजय त्या व्यक्तिंचे एका शब्दात वर्णन करायचे होते. या राऊंडमध्ये जसे सलमान खानचे नाव घेतले गेले, तसे संजय खदखदून हसला आणि ‘घमेंडी’ अशा त्याने शब्दांत सलमानचे वर्णन केले.आता संजयने सलमानला उद्धट, घमेंडी, गर्विष्ट का म्हटले असेल? यामागेही हे कारण आहे. होय, यंदाचा आयफा अवार्ड. होय, यावर्षीच्या सुरुवातीला संजय दत्त आयफा अवार्डला गेला. पण अवार्ड फंक्शन अर्धवट सोडून फॅमिलीला घेऊन युरोप फिरायला बाहेर पडला.  आयफा अवार्डमध्ये फारसा सन्मान मिळत नसल्याचे पाहून नाराज होऊन संजय अवार्ड फंक्शन अर्धवट सोडून गेल्याची चर्चा यानंतर रंगली होती. यावरून सलमानने संजयची अप्रत्यक्षपणे टर उडवली होती. ही बाब कदाचित संजयच्या जिव्हारी लागलीय. याशिवाय संजय व सलमानमध्ये वाद झाल्याचीही चर्चा होती.  संजयला सलमानने त्याची मॅनेजर रेशमा शेट्टी याची सेवा घेण्याचा सल्ला दिला होता. रेशमा तुझे करिअर मार्गी लावेल, असा विश्वास सलमानने दिला होता. त्यानुसार, संजयने रेशमाची सेवा घेतली. पण यानंतरही अनेक महिने कुठलेच काम मिळत नसल्याचे पाहून संजयने रेशमाची हकालपट्टी केली होती. यामुळे सलमान नाराज झाला होता. तेव्हापासून सलमान व संजय यांच्यात बिनसले आहे. कदाचित हा राग संजयने सलमानला घमेंडी म्हणून काढला असावा.