कपिल शर्मासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी! गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत झाले ब्रेकअप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 10:56 IST
कपिल शर्माचे ग्रह सध्या ठीक नाहीत, असेच म्हणायला हरकत नाही. कपिल सध्या करिअरच्या सगळ्यात वाईट टप्प्यातून चाललाय. आधी कपिलचा ...
कपिल शर्मासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी! गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत झाले ब्रेकअप!!
कपिल शर्माचे ग्रह सध्या ठीक नाहीत, असेच म्हणायला हरकत नाही. कपिल सध्या करिअरच्या सगळ्यात वाईट टप्प्यातून चाललाय. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला. मग सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला आजारपणाने (?) घेरले. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले. अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला. माझा शो बंद झालेला नाही तर मी केवळ ब्रेक घेतलायं, असे कपिल सध्या ओरडून ओरडून सांगतोय. पण त्याचे हे म्हणणे पटण्याआधीच आणखी एक बातमी येऊन धडकलीय. होय, कपिलचे त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ हिच्यासोबत ब्रेकअप झाल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, या ब्रेकअपचे कारणही धक्कादायक आहे. होय, कपिलच्या टीममधील एक महिला सदस्य, हे या ब्रेकअपमागचे कारण असल्याचे कळतेय. टीममधील या फिमेल मेंबरसोबत कपिलच्या लिंकअपच्या बातम्या याआधीही आपण ऐकल्या आहेत. पण हीच फिमेल मेंबर कपिलच्या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे कळतेय.कपिल सध्या बेंगळुरुमध्ये उपचार घेत आहे. पण इकडे त्याच्या ब्रेकअपची बातमी आगीसारखी पसरते आहे. चर्चा खरी मानाल तर गिन्नी आणि कपिल सध्या सोबत नाहीत. काही महिन्यांपूर्वी कपिलने गिन्नीसोबतचा लग्नाच्या प्लानची घोषणा केली होती. यावर्षाअखेरिस मी गिन्नीसोबत लग्न करणार असल्याचे त्याने म्हटले होते. पण कदाचित आता कपिल व गिन्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.कपिलच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, टीममधील एक महिला सदस्य सतत कपिलच्या हिताविरोधात काम करतेय. पण कपिल तिच्याविरोधात एक अवाक्षरही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. कपिल प्रचंड भावनिक आहे. आपल्या जवळची व्यक्ति आपल्या धोका देत आपल्या हिताविरोधात काम करतेय, हे तो कधीच स्वीकारू शकत नाही. याच महिला सदस्याने स्वत: तिच्या व कपिलच्या लिंकअपची चर्चा घडवून आणली. आपल्या लिंकअपची चर्चा ऐकल्यानंतर कपिलने लगेच त्याच्या व गिन्नीच्या मॅरेज प्लानची घोषणा केली होती. पण याऊपरही ही महिला सदस्य कपिलच्या आयुष्यात दखल देत आहे. कपिलच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला दूर करण्याचे तिचे प्रयत्न आहेत. हीच महिला सदस्य कपिल व गिन्नीच्या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.ALSO READ : वारंवार का आजारी पडतोयं कपिल शर्मा? हे तर नाही खरे कारण??आता सूत्रांनी या महिला सदस्याचे नाव घेतले नाही. पण ही महिला सदस्य प्रीती सिमोस असल्याचा अंदाज आहे. कारण क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रीति सिमोससोबत कपिलचे नाव जोडले गेले होते. आता खरे काय ते कपिललाच ठाऊक़