Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतचा आणखी एक खुलासा; राम रहीमच्या खोलीत गेल्याने हनीप्रीत मला सवत समजायची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 22:20 IST

काही दिवसांपूर्वीच आयटम गर्ल राखी सावंत हिने बलात्कारी गुरुमीत राम रहीमच्या डेºयातील खुपिया खोलीत जाऊन आल्याचा खुलासा केला होता. ...

काही दिवसांपूर्वीच आयटम गर्ल राखी सावंत हिने बलात्कारी गुरुमीत राम रहीमच्या डेºयातील खुपिया खोलीत जाऊन आल्याचा खुलासा केला होता. आता राखीने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, राखीच्या मते मी बाबा राम रहीमच्या क्लोज जात असल्यामुळे हनीप्रीत स्वत:ला इनसिक्योर मानायची. ती मला तिची सवत समजायची. राखीने हा खुलासा एका चॅनलशी बोलताना केला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘मी राम रहीमच्या डेºयातील गुप्त खोलीमध्ये गेली असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्याठिकाणी मी वियाग्रा बघितल्याचा तिने खळबळजनक खुलासा केला होता.’ पुढे बोलताना राखीने हेदेखील म्हटले की, मला राजकारणात प्रवेश करण्याचा राम रहीमनेच सल्ला दिला होता. त्यासाठी तो मला सिरसा येथे घेऊन गेला होता. सध्या राखी एका पक्षाशी जुळलेली आहे. राखीने पुढे बोलताना म्हटले की, बाबाने मला त्याच्या बर्थ डे पार्टीत सहभागी होण्यासाठी डेºयात बोलाविले होते. त्यावेळी बाबासोबत माझी जवळीकता बघून हनीप्रीत स्वत:ला खूपच असुरक्षित समजूू लागली. ती मला तिची सवत समजू लागली. राखीचे म्हणणे आहे की, हनीप्रीत खूप सुंदर आहे. परंतु माझ्यापेक्षा नाही. राखीने यावेळी गुरुमीत राम रहीमला जेलमध्ये भेटण्याची इच्छाही व्यक्त केली. ती म्हणाली की, मला बाबाला भेटण्यासाठी जेलमध्ये जायचे होते. त्याला माझ्या हातचे जेवण द्यायचे होते. परंतु जेव्हा मला कळले की, तो बलात्कारी आहे, तेव्हा मी माझा हा विचार बदलला आहे. राम रहीमच्या वादग्रस्त जीवनावर एका चित्रपटाची निर्मिती केली जात असून, त्यामध्ये हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत आहे. या चित्रपटाविषयीही राखीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. राखीच्या मते, मला काही दिवसांपूर्वीच एक फोन आला होता, त्यांनी मला हा चित्रपट न बनविण्याचे सांगितले. यावेळी राखीने हादेखील दावा केला की, फोन करणारी हनीप्रीतच होती. पुढे बोलताना राखीने म्हटले की, हनीप्रीत मला म्हणायची की, जर बाबाची दृष्टी तुझ्यावर पडली तर तू खरोखरच भाग्यशाली आहे. मी लहानपणापासूनच डेºयात राहात असून, माझे बाबावर प्रेम जडले आहे. राखीने केलेल्या खुलाशानुसार बाबा स्वत:ला भगवान कृष्ण समजायचा. त्याच्या डेºयात अनेक मुली आणि महिला होत्या. त्यामुळे तो महिला तथा तरुणींसोबत असे प्रकार राजरोसपणे करायचा, असेही राखीने म्हटले.