गायक अभिजितचे आणखी एक वादग्रस्त tweet!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 15:30 IST
गायक अभिजित भट्टाचार्य आणि वाद यांचा जुना संबंध आहे. twitterवरून वादग्रस्त tweet करून स्वत:हून वाद ओढवून घेणाºयात कदाचित अभिजितचा ...
गायक अभिजितचे आणखी एक वादग्रस्त tweet!
गायक अभिजित भट्टाचार्य आणि वाद यांचा जुना संबंध आहे. twitterवरून वादग्रस्त tweet करून स्वत:हून वाद ओढवून घेणाºयात कदाचित अभिजितचा पहिला क्रमांक लागेल. आता अभिजितने लक्ष्य केलेय, ते थेट दिग्दर्शक करण जोहर याला. होय, करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी सिनेमात पाकिस्तानी अभिनेता असल्याने हा सिनेमा वादात सापडला आहे. नेमक्या याच मुद्यावरून अभिजितने करणला लक्ष्य करीत त्याला ‘फवादची बायको’ संबोधले आहे. ‘आणखी एक लव्ह जिहाद... मेहबुबा करण जोहर निराश...पाकिस्तानी लव्हर फवादने धोका दिला. बिच्चारी मिसेस करण जोहर-खान,’असे tweet अभिजितने केले आहे. लवकरच करणच्या ‘कॉफी विद करण’चे नवे सीझन येणार आहे. या चॅट शोमधील पहिला पाहुणा फवाद खान असेल, अशी बातमी होती. पण करणने ही बातमी निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. माझ्या चॅट शोचा पहिला गेस्ट फवाद नसणार, असे त्याने स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया प्यक्त करताना अभिजितने करणला डिवचले आहे. आता यावर करण काय बोलतो,ते बघूच! }}}}