Join us

​बॉलिवूडच्या ‘शर्मा ब्रिगेड’मध्ये होणार आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 15:16 IST

अख्खे बॉलिवूड ‘कपूर्स’ आणि ‘चोप्राज्’ने भरलेले आहे. पण बॉलिवूडमध्ये ‘शर्माज्’ची पण कमतरता नाहीयं. होय, अनुष्का शर्मा, कपिल शर्मा, अभिषेक ...

अख्खे बॉलिवूड ‘कपूर्स’ आणि ‘चोप्राज्’ने भरलेले आहे. पण बॉलिवूडमध्ये ‘शर्माज्’ची पण कमतरता नाहीयं. होय, अनुष्का शर्मा, कपिल शर्मा, अभिषेक शर्मा, एवलिन शर्मा, नेहा शर्मा. लवकरच या ‘शर्माज्’च्या यादीत आणखी दोन नाव सामिल होणार आहेत. पहिले म्हणजे, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याचे. आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्रि’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करतोय. आयुषनंतर याच आडनावाची आणखी एक अभिनेत्रीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेय. ही अभिनेत्री कोण तर ‘तुम बिन2’सह अनेक चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री नेहा शर्मा हिची बहिण आयशा शर्मा.होय, आयशाला एका मोठ्या चित्रपटाची लॉटरी लागली आहे, ती सुद्धा जॉन अब्राहमसोबत. म्हणजेच, जॉनची हिरोईन म्हणून आयशा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आता या चित्रपटाचे नाव, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. निखिल अडवाणी एक नवा चित्रपट घेऊन येतो आहे. मिलाप झावेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याच चित्रपटात आयशाची वर्णी लागली आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट असणार आहे. यात एक पोलिस अधिकारी आणि एका गुन्हेगाराची कथा असल्याचे कळतेय. मनोज वाजपेयी हा सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे.बिहारचे नेते अजित शर्मा यांची मुलगी आयशा सध्या मॉडेलिंग करते. यापूर्वी ती वरूण धवनसोबत ‘जुडवा2’मध्ये दिसणार, अशी चर्चा होती. पण त्यावेळी त्यावेळी काहीतरी कारणावरून नेहाची ही संधी हुकली. अर्जुन कपूरच्या ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटासाठीही आयशाचे नाव चर्चेत होते. आयशाने साऊथच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण जॉनसोबतचा तिचा हा पहिला चित्रपट असेल. आता या पहिल्या चित्रपटात आयशा प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडते, ते बघूच.