Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने सुरु आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 10:50 IST

सध्या ते रुग्णालयातच असून कार्डिओलॉजिस्ट यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अभिनेते आणि टेलिव्हिजन होस्ट अन्नु कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने काल सकाळीच त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

अन्नू कपूर हे बॉलिवुडमधील ज्येष्ठ अभिनेते आहेत. तसेच सध्या ते टेलिव्हिजनवर विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. काल अचानक चेस्ट कन्जेक्शन झाल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते रुग्णालयातच असून कार्डिओलॉजिस्ट यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार याविषयी डॉक्टर लवकरच अधिकृत माहिती देतील.

अन्नू कपूर हे भोपालचे असून पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पारसी थिएटर कंपनी चालवायचे तर त्यांची आई उत्तम कवयित्री होत्या. अन्नू कपूर यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. गेल्या ४० वर्षांपासून ते फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 

टॅग्स :अन्नू कपूरदिल्लीहॉस्पिटल