Join us

अ‍ॅन अनसुटेबल बॉय: आत्मकथेच्या लाँचिंग प्रसंगी करणने केले हे ७ धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 17:02 IST

मागच्या काही आठवड्यांपासून करण जोहरच्या बायोग्राफीची खूप चर्चा सुरू आहे. मनात येईल ते बोलण्यासाठी करण ओळखला जातो. त्यामुळे आत्मकथेमध्ये ...

मागच्या काही आठवड्यांपासून करण जोहरच्या बायोग्राफीची खूप चर्चा सुरू आहे. मनात येईल ते बोलण्यासाठी करण ओळखला जातो. त्यामुळे आत्मकथेमध्ये काय लिहितो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. आतापर्यंत पुस्तकातील अनेक शॉकिंग खुलासे बाहेर आलेले आहेत. करणने त्याच्या बहुचर्चित लैंगिकतेविषयी, ‘बेस्ट फ्रेंड’ काजोलशी तुटलेल्या संबंधाविषयी, शाहरुखसोबतच्या अफेयरविषयी या पुस्तकात लिहिले आहे.अखेर मुंबईत पार पडलेल्या एक दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचे शाहरुख खानच्या हस्ते अधिकृत प्रकाशन करण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीमधील त्याचे अनेक सेलिब्रेटी मित्र उपस्थित होते. प्रसिद्ध लेखिका शोभा डेदेखील या बुक लाँचला उपस्थित होत्या.या कार्यक्रमात तो पाच असे मुद्दे बोलला जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ते काय?१. लैंगिकतेविषयी करण पुन्हा बोललाकरण आणि त्याची लैंगिकता म्हणजे गॉसिप लव्हर्सचा आवडीचा विषय आहे. तो स्वत:देखील हे मान्य करतो. त्यामुळे या पुस्तकात त्याने स्वत:च्या लैंगिकतेविषयी सविस्तर लिहिले आहे. ‘मी सेलिब्रेटी असल्या कारणाने लोकांना असे वाटते की, माझ्यावर ते हक्क गाजवू शकतात. त्यामुळे माझा लैंगिक कल काय आहे हे जाणून घेण्याची त्यांना भलती उत्सुकता राहते.’२. शाहरुखसोबतचे समीकरणशाहरुख-करण आणि करण-शाहरुख असे जणुकाही बॉलीवूडमध्ये समीकरणच रुढ झालेले आहे. गेल्या २५ वर्षांपासुनची त्यांची मैत्री आजतागायत कायम आहे. करण म्हणतो की, ‘मी जेव्हा शाहरुखला सर्वप्रथम भेटलो तेव्हा त्याच्यामधील चांगुलपणा सर्वाधिक भावला. तो ज्यापद्धतीने माझ्या वडिलांचा आदर करीत असे ते पाहून मला त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढला.३. कभी अलविदा ना कहेना‘कभी अलविदा ना कहेना’च्या प्रीव्ह्युवमध्येच करणला चित्रपटाचे भविष्य कळाले होते. चित्रपटातील शाहरुख-राणीचा इंटिमेट लव्ह सीन पाहून त्या प्रीव्ह्युवमधून एक जोडपे उठून निघून गेले होते. तेव्हाच करणला कळाले लोकांना हा चित्रपट काही आवडणार नाही.४. काजोलशी ताटातूटएकेकाळी जीवाभावाचे मित्र-मैत्रिण असणारे करण-काजोल यांची मैत्री अत्यंत दुर्दैवीरीत्या संपुष्टात आली आहे. तो म्हणतो, काजोल आणि माझ्यामध्ये आता काहीच नाते उरले नाही. त्याची अनेक कारणे आहेत जी मी सर्वांसमोर नाही आणू शकत पण तिने मला मनापासून हर्ट केले आहे.५. शाहरुखच्या कुटूंबाविषयीहे तर सगळ्यांनाचा माहित आहे की, करणच्या मनात शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाविषयी किती प्रेम आणि जिव्हाळा आहे. तो म्हणाला की, ‘त्याची फॅमिली ही माझी फॅमिली आहे. आमचे नाते व्यवसायिक नसून त्यापलिकडील आहे. शाहरुखची मुले मला अत्यंत प्रिय असून आर्यन खानच्या डेब्यू जर झाला तर तो केवळ माझ्याच चित्रपटातून होईल.’