Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का चालवतेय ट्रॅक्टर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 09:23 IST

 शीर्षक वाचून विचारात पडलात ना? अहो एवढं गोंधळून जाऊ नका. अनुष्का शर्मा ‘सुल्तान’ ची शूटिंग करत असून ती सेटवर ...

 शीर्षक वाचून विचारात पडलात ना? अहो एवढं गोंधळून जाऊ नका. अनुष्का शर्मा ‘सुल्तान’ ची शूटिंग करत असून ती सेटवर ट्रॅक्टर चालवताना दिसली. हरयाणा येथे चित्रपटाची टीम ‘सुल्तान’चा उत्तरार्ध शूट करत असून प्रत्येक सीनसाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे.या फोटोत अनुष्का शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या सलवार कमीसमध्ये ती दिसत असून मरून रंगाचा स्वेटर तिने घातलेला दिसत आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ती शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसतेय.या फोटोला कॅप्शन टाकले आहे की,‘ यू हॅव सीन अनुष्का शर्मा रेसल, नाऊ सी हर ड्राईव्ह अ ट्रॅक्टर सुल्तान.’ अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘सुल्तान’ चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार असून ईदला चित्रपट रिलीज होणार आहे.