Join us

अंकिताला होतेय चुकांची आठवण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 09:51 IST

‘मेड फॉर इच अदर’ वाटावे असे कपल म्हणजे सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे आता मात्र एकमेकांपासून चांगलेच दुरावले आहे. ...

‘मेड फॉर इच अदर’ वाटावे असे कपल म्हणजे सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे आता मात्र एकमेकांपासून चांगलेच दुरावले आहे. तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला सांगितले की,‘ सुशांतसिंग मुळे तिला तिच्या आयुष्यातील खुप महत्त्वाच्या असाईनमेंट्स सोडून द्याव्या लागल्या.दुसरीकडे, सुशांतने मात्र महेंद्रसिंग धोनीची बायोपिक, ‘राब्ता’ चित्रपट असे अनेक प्रोजेक्ट्सचे काम हाती घेतले. तसेच त्याने मालाड येथून वांद्रे येथे घर हलवले. सुशांतसोबत प्रेम झाल्यामुळे अंकिताला तिचा ‘पवित्र रिश्ता’ हा शो सोडावा लागला.वेल, पण आता तिला याची जाणीव होतेय की, सुशांतमुळे तिला किती प्रोजेक्ट्स सोडावे लागले. मात्र, आता तिने स्वत:चे वजन एवढे कमी केले आहे की, तिला साहजिकच प्रचंड असाईनमेंट्स येणार आहेत. तिला पुन्हा एकदा स्वत:चे पूर्वीप्रमाणेच नाव करायचे आहे.