Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कर्तव्य आहे..!, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:54 IST

अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तिनेच ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे बऱ्याच काळापासून चित्रपट किंवा मालिकेत झळकली नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी बिझनेसमन विकी जैनसोबत रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अंकिताचे चाहते तिला वधूच्या गेटअपमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तिनेच ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अंकिता आणि विकी बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये आहे. आता अंकिताने एका मुलाखतीत सांगितले की, मला एका प्रेमाची गरज आहे. जसे जेवण गरजेचे आहे तसे माझ्या जीवनात प्रेमाची गरज आहे.

आपल्या लग्नाबद्दल अंकिता लोखंडे म्हणाली की, प्रत्येक मुलीसाठी लग्न हा खूप चांगला अनुभव असतो. मी पण माझ्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की तो दिवस लवकरच येणार आहे. मी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. 

अंकिताने पुढे सांगितले की ते डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. ती म्हणाली की, माझे लग्न जोधपूर किंवा जयपूरमध्ये होणार आहे. सध्या याबद्दल काही प्लानिंग नाही. पण मला राजस्थानी अंदाजात लग्न करायचे आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रिलेशनशीपला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. या मालिकेशिवाय अंकिता मणिकर्णिका आणि बागी ३ मध्ये पहायला मिळाली होती.

टॅग्स :अंकिता लोखंडेमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी