अंकिता लोखंडे सध्या कोणाच्या प्रेमात आहे, हे तर तुम्ही जाणताच. होय, विकी जैनच्या प्रेमात अंकिता अक्षरश: वेडी झाली आहे. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अंकिता अख्खा दिवस विकीसोबत होती. त्याच्यासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो तिने इन्स्टास्टोरीवर शेअर केलेत. याचदरम्यान तिचा एक व्हिडीओ समोर आला आणि व्हिडीओ पाहताच लोकांनी अंकिताला ट्रोल करणे सुरु केले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आता या व्हिडीओत असे काय आहे की, अंकिता ट्रोल झाली तर तिचा अॅटिट्यूड. होय, व्हिडीओत अंकिता व विकी कन्व्हर्टिबल कारमध्ये जाताना दिसत आहेत. याचदरम्यान काही फोटोग्राफर अंकिताचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. पण फोटोग्राफर्सला पाहताच अंकिताचे मूड आॅफ होते. आरामात, नाही तर दुखापत होईल, असे ती चालत्या गाडीतून फोटोग्राफर्सला म्हणते. यावेळचा तिचा अॅटिट्यूड पाहून लोकांनी या व्हिडीओवर निगेटीव्ह कमेंट्स केल्या आहेत.
‘लोकांना दाखवण्यासाठीच अशा गाडीमधून फिरतेय आणि फोटोग्राफर्सने फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर इतका अॅटिट्यूड,’ असे एका युजरने या व्हिडीओवर लिहिले. फारच अॅटिट्यूड, इतका माज असे एका युजरने तिला सुनावले. व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने अंकिताने बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. या ती ब्लॅक मोनोकिनीत आहेत.
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.