Join us

Video : बॉयफ्रेन्ड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 13:58 IST

विकी जैन मागून काहीतरी बोलतो आणि त्याचे ते शब्द ऐकून अंकिता त्याच्यावर बिथरते.

ठळक मुद्देनुकतेच अंकिताने एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली होती. 

टीव्ही स्टार अंकिता लोखंडेने यंदाची दिवाळी भलतीच धुमधडाक्यात साजरी केली. बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबतचे तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय तिचा व विकीचा एक व्हिडीओही चर्चेत आहे. या व्हिडीओत अंकिता तिच्या बॉयफ्रेन्डवर ओरडताना दिसतेय. या व्हायरल व्हिडीअत अंकिता  विकी जैन आणि इतर मित्र-मैत्रिणींसोबत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेय.  हसत-खेळत, मस्करी करत  शुभेच्छा देत असताना विकी जैन मागून काहीतरी बोलतो आणि त्याचे ते शब्द ऐकून अंकिता त्याच्यावर बिथरते.

‘ सोशल मीडियावर असे काही बोलू नको,’असे अंकिता म्हणते. यानंतर  पुन्हा एकदा अंकिता व विकी मिळून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अंकिताने दिवाळी सेलिब्रेशनचे विकीसोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिची व विकीची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.  

 लोक म्हणाले, सुशांतला विसरली का?    एक्स बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येने अंकिताला मोठा धक्का बसला होता. मात्र आता ती या दु:खातून बाहेर पडलेली दिसतेय. दिवाळी सेलिब्रेशनचे तिचे फोटो पाहून तरी हेच वाटतेय. काल अंकिताने पिंक कलरच्या लहंग्यातील फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते.

खास म्हणजे या फोटोत अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकी जैन हाही तिच्यासोबत दिसला होता.  मला, तुला सर्वांना हॅपी दिवाली, असे कॅप्शन हे फोटो शेअर करताना अंकिताने लिहिले होते. मात्र यानंतर  नेमक्या याच फोटोंमुळे अंकिताला ट्रोल झाली होती.इतक्यात सुशांतला विसरली का? असा सवाल सुशांतच्या एका नाराज चाहत्याने केला होता. जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूतचे काय झाले?असा सवालही अनेकांनी तिला केला होता.

सर्वांसमोर मागितली  माफी

नुकतेच अंकिताने एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली होती. अंकिता लोखंडेने या पोस्टसोबत स्वत:चा आणि विक्की जैनचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे. माझी प्रत्येक अडचण स्वत:ची समजून माझी मदत केल्यामुळे मी आभारी आहे. माझा सपोर्ट सिस्टम बनण्यासाठी मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आणि माझी परिस्थिती समजून घेतली त्यासाठी आभारी आहे. माझ्यामुळे तुला टीका सहन करावी लागली त्यासाठी मला माफ कर. शब्द कमी पडतील पण आपले बॉण्डिंग खूप छान आहे. आय लव्ह यू, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.

अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

टॅग्स :अंकिता लोखंडे