Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्मात्याने केली होती एक रात्र सोबत घालवण्याची मागणी; अंकिता लोखंडेचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:45 IST

अंकिता लोखंडेची एक मुलाखत सध्या जाम चर्चेत आहे. या मुलाखतीत अंकिताने पर्सनल लाईफबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले.

ठळक मुद्देबॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने कास्टिंग काऊचचा एक शॉकिंग अनुभव शेअर केला.

अंकिता लोखंडेची एक मुलाखत सध्या जाम चर्चेत आहे. या मुलाखतीत अंकिताने पर्सनल लाईफबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत सिंग राजपूतसोबतचे ब्रेकअप, रिजेक्शन, डिप्रेशन यावर ती बोलली. शिवाय कास्टिंग काऊचबद्दलही तिने धक्कादायक खुलासा केला.

तो म्हणाला, निर्मात्यासोबत एक रात्र...बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने कास्टिंग काऊचचा एक शॉकिंग अनुभव शेअर केला. तिने सांगितले, खूप वर्षाआधी मी केवळ 19-20 वर्षांची असताना मला एका साऊथ सिनेमासाठी बोलवल्यात आले होते. त्या माणसाने मला त्याच्या खोलीत बोलवले. आम्ही तुला काही विचाारू इच्छितो, असे तो म्हणाला. यावर विचारा, असे मी म्हणाले. यावर  तुला कॉम्प्रमाइज करावे लागले, असे तो म्हणाला. त्या खोलीत मी एकटे होते. त्यामुळे मी थोडा स्मार्टनेस दाखवला. ठीक आहे, कशाप्रकारचे कॉम्प्रमाइज करावे लागेल सांगा? तुमच्या निर्मात्याला काय हवं ते सांगा? असे मी न घाबरता त्याला विचारले. यावर, तुला निर्मात्यासोबत एक रात्र घालवावी लागेल, असे तो म्हणाला आणि मी त्याचा बँड वाजवला. तुम्हाला एक टॅलेंटेड अभिनेत्री नको तर निर्मात्यासोबत झोपणारी मुलगी हवी आहे, असे त्याला सुनावत मी तेथून बाहेर पडले. त्या घटनेने मी भांबावले होते. मी कोणत्या इंडस्ट्रीत आले? असा प्रश्न स्वत:ला विचारत होते. 

एका मोठ्या अभिनेत्यानेही केले होते असे कृत्य...कास्टिंग काऊचची अशीच आणखी एक घटनाही तिने सांगितले. तिने सांगितले, मी एका मोठ्या अभिनेत्याला भेटले होते. त्याचे नाव सांगणार नाही. त्याच्याशी हात मिळवला आणि मी लगेच मी माझा हात मागे खेचला होता. कारण त्याच्याकडून आलेले वाईब्स मी अनुभवले होते आणि ते चांगले नव्हते. त्या अभिनेत्याला सगळेच ओळखतात. या घटनेचाही मला मोठा शॉक बसला होता.

मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली

टॅग्स :अंकिता लोखंडे