Join us

अंकिता लोखंडे व विकी जैनच्या प्रेमाला बहर; म्हणाली, हा आहे माझा बेबी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 10:50 IST

एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने अंकिता लोखंडे सैरभैर झाली होती. पण आताश: ती या धक्क्यातून सावरतेय.

ठळक मुद्देअंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने अंकिता लोखंडे सैरभैर झाली होती. पण आताश: ती या धक्क्यातून सावरतेय. बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत अंकिता आनंदी आहे. नुकतेच अंकिताने विकीसोबतचे काही फोटो शेअर केलेत.अंकिताने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती विकीच्या मिठीत विसावलेली दिसतेय. ये है मेरा बेबी, या कॅप्शनसह तिने हा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. 

सर्वांसमोर मागितली  माफी

नुकतेच अंकिताने एक पोस्ट शेअर करत तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली होता. अंकिता लोखंडेने या पोस्टसोबत स्वत:चा आणि विक्की जैनचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे. माझी प्रत्येक अडचण स्वत:ची समजून माझी मदत केल्यामुळे मी आभारी आहे. माझा सपोर्ट सिस्टम बनण्यासाठी मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आणि माझी परिस्थिती समजून घेतली त्यासाठी आभारी आहे. माझ्यामुळे तुला टीका सहन करावी लागली त्यासाठी मला माफ कर. शब्द कमी पडतील पण आपले बॉण्डिंग खूप छान आहे. आय लव्ह यू, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. 

अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा'

नव्या वधूप्रमाणे नटून थटून अंकिता लोखंडेने साजरा केला करवाचौथ, फोटो पाहून फॅन्स म्हणाले- चाँद नजर आया

टॅग्स :अंकिता लोखंडे