Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुल्लमखुल्ला प्यार करेंगे...! अंकिता लोखंडेने शेअर केलेत बॉयफ्रेन्डसोबतचे रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:06 IST

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली  अभिनेत्री अंकिता लोखंडेने सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देअंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली  अभिनेत्री अंकिता लोखंडेने  सध्या  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. गत 19 डिसेंबरला अंकिताना तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. यानंतर आता अंकितान बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  यात विकी व अंकिता मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत. हे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. अंकिताने हे फोटो शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत.

अंकिता व विकीच्या  अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने या नात्याची कबुली दिली होती.

विकीसोबतचे  काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून तिने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. या फोटोत विकी आपल्या गुडघ्यांवर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत लव्हलाईफमुळे अंकिता चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. 

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडे