Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेच्या चेह-यावर फुलले हास्य, कुटुंबात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 11:01 IST

एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे कोलमडली होती. पण अनेक दिवसानंतर अंकिताच्या चेह-यावर हास्य फुलले.

ठळक मुद्दे विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.

एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे कोलमडली होती. पण आता अनेक दिवसानंतर अंकिताच्या चेह-यावर हास्य दिसतेय. याचे कारण म्हणजे, तिच्या कुटुंबात दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. होय, अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकी जैन याची बहीण वर्षा जैन हिने दोन जुळ्यांना जन्म दिला. अंकिताने या दोन्ही जुळ्यांचे नाव जाहीर करत, एक फोटो शेअर केला.होणा-या नणंदेच्या दोन्ही मुलांना कवटाळून पोज दिली आहे. या फोटोत अंकिता प्रचंड आनंदी दिसतेय. या फोटोसोबत तिने लिहिलेय, ‘आमचे कुटुंब आनंद साजरा करतेय. एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. जुळ्यांच्या जन्माने आमचे कुटुंब आणखी मोठे झालेय, वेलकम अबीर व अबीरा... ’

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता अचानक चर्चेत आली होती. सुशांत व अंकिता सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर सुशांतच्या आयुष्यात रिया चक्रवर्तीची एन्ट्री झाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर दिलेल्या मुलाखतीत अंकिताने अनेक खुलासे केले होते. सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. तो आत्महत्या करणा-यांपैकी नव्हताच, असे अंकिता म्हणाली होती.अंकिता सध्या विकी जैनसोबत नात्यात आहे. दोघांचा साखरपुडा झाल्याचेही मानले जात आहे. गेल्यावर्षी अंकिता व विकीने मुंबईत 8 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. लग्नानंतर दोघेही याच फ्लॅटमध्ये राहणार असल्याचे कळते.

 विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.अंकिता लोखंडे हिने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला  सुरूवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला होता.   या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

टॅग्स :अंकिता लोखंडे